Tuesday, 18 December 2018

...म्हणून त्याने प्रेयसीचे घर पेटवले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

एकतर्फी प्रेमातून मुलीचे घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोमियोला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, अटक केलेल्या युवकाचे नाव रितेश मेहरोल असे आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • हा युवक शहरातील खारटन परिसरात राहतो त्याच परिसरात मुलगीही राहते त्यामुळे त्यांच्यात ओळख निर्माण झाली
  • रितेश हा एकतर्फी प्रेम करू लागला त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली होती परंतु तिने नकार दिला यावरून दोघात भांडण झाले
  • त्यानंतर रितेशने रात्रीच्या सुमारास मुलीच्या घराजवळ जाऊन घर जाळण्याचा प्रयत्न केला
  • मात्र मुलीच्या घरातील सदस्य घराबाहेर पडले आणि सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली

या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि रितेश मेहरोल याला अटक केली.

रितेशवर यापूर्वीचेही काही गुन्हे दाखल आहेत.

रितेशने तिला लग्नाची मागणी केल्यानंतर देखील तिच्या मागे लग्नाची मागणी करत होता.

अखेर तिने नकार दिल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले आहे, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य