Tuesday, 18 December 2018

सामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीचा भडका अजूनही कायम आहे, आज पेट्रोल 24 पैसे तर डिझेल 32 पैशांनी महागलं आहे.

मुंबईत पेट्रोल 91 रुपये 08 पैसे तर डिझेल 79.72 पैसे झालं आहे, तर दुसरीकडे रोजच्या इंधन वाढीने त्रस्त असलेल्या सामन्य नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे.

गॅस सिलेंडरच्या दरातही आता मोठी वाढ झाली आहे, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबरोबर आता दिल्लीत सीएनजीही महाग झाले आहे.

त्याचबरोबर विमान इंधनाचे देशांतर्गत दर दोन हजार सहाशे पन्नास रूपये प्रति किलोलीटर वाढल्यामुळे हवाई प्रवासही महागण्याची शक्यता आहे.

सबसिडी असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 2.89 रुपयांनी वाढून ती 502.4 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.

दिल्लीत विना सबसिडी असलेला सिलिंडर 59 रुपयांनी महाग झाला आहे.

इंडियन ऑइलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमती आणि विदेश मुद्रा विनिमय दरातील चढ-उतारामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य