Wednesday, 16 January 2019

#BharathBandh काँग्रेससह ‘मनसे’चाही बंदला पाठिंबा, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे.

दरम्यान चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

तसेच चेंबूर हायवेवर ट्रेलर आडवा करून मुंबई-पुणेची वाहतूक रोखली, यादरम्यान पोलिसांनी मनसे विभाग अध्यक्ष कर्णा दुनबळे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

तसेच वाशी नाका आणि प्रतीक्षानगरमध्ये दगडफेक करण्यात आली. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

दादर प्लाझा जवळ मनसे सैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्या रोखल्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

तसेच अंधेरी स्थानकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रेलरोको करण्यात आला.

अशोक चव्हाण यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांनी स्थानकावर घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला, तर यावेळी काही कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरुन लोकल अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अशोक चव्हाण,संजय निरुपम आणि माणिकराव ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य