Thursday, 17 January 2019

डिझेल दरवाढीविरोधात मच्छिमार कोळी बांधवही आक्रमक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मासेमारी व शेती व्यवसायामूळे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात मोलाची भर (18% ) टाकीत असताना अशा व्यवसाय-उद्योगांना सोयी सूविधांची केंद्रसरकारने तरतूद करण्याऐवजी ,डिझेलचे दर भरमसाट वाढवून मच्छिमारी व्यवसायाची कोंडी केली आहे.

अंधेरी पश्चिममधल्या वेसावा कोळीवाडा येथे उद्या सोमवार दिनांक 10 सप्टेंबर 2018 रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास भव्य निषेध प्रदर्षण होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या डिझेल ईंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ  जवळपास 600 ते 800 कोळी बांधव वेसावा येथील बाजार गल्ली बंदर येथे जमणार आहेत व भारत सरकारच्या ह्या निर्णयाचा विरोध घोषणाबाजी व बँनर लावुन करतील.

कोळी बांधवांच्या यांत्रिकी नौका (ट्राँलर) ह्या डिझेलवरच चालत असतात व भाववाढीच्या ह्या जालीम निर्णयामुळे मच्छिमार कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय संपवण्याचाच घात ह्या सरकारने केले असल्याचा कोळी बांधव विरोध करत आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य