Wednesday, 16 January 2019

एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला 2 वर्ष कशी लागतात? - लोणीकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

एकीकडे भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामळे ठिकठिकाणी निदर्शनं होत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

“एका वर्षभरात मुलं होतात मग पाणी पुरवठा योजनांसाठी पैसे खर्चायला दोन वर्ष कशी लागतात?” असा सवाल लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

नांदेड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्या नसल्याने संबधित अधिकाऱ्यांना लोणीकरांनी चांगलेच फैलावर घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काल जिल्ह्यातील 10 पाणी पुरवठा योजनांच्या ई-भुमिपूजनानंतर आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सरकारनं निधी देऊनही त्याचा वापर झाला नसल्यानं संतापलेल्या लोणीकर यांची जीभ घसरली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य