Sunday, 18 November 2018

सोनाली बेंद्रेला राम कदमांनी वाहिली श्रद्धांजली!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच, भाजपा आमदार राम कदम आता नवीन वादात अडकले आहेत.

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट करत राम कदम यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा चौफेर टीकेची झोड उठू लागलीय..यावरून ते नेटकऱ्यांकडून पुन्हा ट्रोल झालेत.

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाची बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

ramkadamtweet.png

 

मात्र त्यांना हि अफवा आहे असे कळल्यावर त्यांनी ते ट्विट लगेच डिलीट केले आणि लगेच माफीचे ट्विट करून हि अफवा असून मी तिच्या तब्येतीसाठी आणि लवकर बरी व्हावी अशी देवा जवळ प्रार्थना करतो असे ट्विट केले आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य