Wednesday, 16 January 2019

"कोणतीही निवडणूक लढवणार नाही" - चंद्रकांत पाटील

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येणारी लोकसभा,विधानसभा,तसेच पदवीधर मतदारसंघाची कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

कोल्हापुरातल्या गणराया अवार्ड वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

चंद्रकांतदादांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दादा निवडणूक सोडून पुढे काय भूमिका घेणार अशी चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.

राज्य सरकारमधले क्रमांक दोनचे नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा यांनी अशी घोषणा करण्यामागे काय कारण आहे याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...

loading...

Top 10 News

राशी भविष्य