Friday, 18 January 2019

मुंबईत शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेप करण्यास पूर्णपणे बंदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बृहन्मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्रामध्ये रूग्णालये, शैक्षणिक संस्था, धर्मस्थळ व न्यायालये यांचा समावेश आहे.

शांतता क्षेत्रे ही 24 तास म्हणजेच दिवस व रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपक संगीत वाद्य, फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी आहे.

शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आवश्यक परवाना घेऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता येणार आहे.

कायद्यानुसार आवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील 100 क्रमांक तसेच 738144144,7738133133 या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

loading...

Top 10 News

राशी भविष्य