Friday, 18 January 2019

एस.टी महामंडाळाला नवीन 500 बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी - सुधीर मुनगंटीवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला नवीन 500 बसेस  खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आज एस.टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.

 महामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील काही स्थानकांच्या कामांचा आढावाही घेतला.

तसेच उर्वरित स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत.

त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

loading...

Top 10 News

राशी भविष्य