Wednesday, 16 January 2019

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू - राम कदम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू, असं वक्तव्य दहीहंडीच्या गर्दीसमोर आमदार राम कदम यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे.

भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं.

यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्याने त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावे.

त्या मुलाच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन, असं वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवादम्यान केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य