Tuesday, 20 November 2018

तुरीचे राजकारण पेटलं; मित्रपक्षाकडून भाजपला घरचा आहेर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीला 30 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

परंतु, प्रत्यक्षात मात्र अजूनही तूर खरेदीला सुरवात झालेली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अद्यापही बिकटचं आहे.

 

एकीकडे हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवादिल झालाय आणि अशातचं नाफेडचे अधिकारी मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे साफ दुर्लक्ष करताना दिसात आहेत.

 

त्यामुळे नागपूरात सत्ताधाऱ्यांच्या वतीने  ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाफेडने आतापर्यंत जी तूर खरेदी केलीये ती व्यापाऱ्यांची तूर आहे.

 

अधिकाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सरकारने जर लवकरात लवकर तुर खरेदी केली नाही तर तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू, असा इशारा

शिवसैनिकांनी दिला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य