Wednesday, 16 January 2019

लोकलमधून प्रवास करताय सावधान!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोकमध्ये दररोज अनेकजण प्रवास करतात आणि प्रवासामध्ये लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे काहीजणांना लोकलच्या दरवाज्यावरचं उभे राहून प्रवास करावा लागतो, आणि यामुळे अनेकदा काही अपघातही घडतात.

तसेच सध्या लोकलच्या प्रवासात मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत. रेल्वे पोलिसांकडे दररोज मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी येत असतात.  

यामध्ये पश्चिम रेल्वे प्रथम क्रमांकावर आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली,अंधेरी आणि वांद्रे या 3 महत्त्वाच्या स्थानकांमध्ये वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. 

या स्थानकांवर दररोज मोबाईल चोरीच्या घटना घडताना पहायला मिळत आहे. यामध्ये मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त घटना अंधेरी स्थानकावर घडताना पाहायला मिळतात.

या प्रकरणात तक्रारींच्या तुलनेत प्रकरणावर तोगडा काढण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांकडून रेल्वे पोलिसांच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

रेल्वेत गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्या, स्थानकांजवळ उभे राहून मोबाईल हातातून हिसकावून घेतात असे प्रकार पोलिसांना माहित असूनही रेल्वे पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं प्रवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आता प्रवाशीच सतर्क होताना दिसत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य