Saturday, 15 December 2018

मध्य रेल्वे रुळावर, मोटरमेनचा संप अखेर मागे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वे कोणत्याही कारणामुळे रखडतच असते पण आज मोटरमेननी ओव्हरटाइम न करण्याचा निर्णय घेतल्याने रखडली होती.

मोटरमेनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे त्यामुळे घरी जाणाऱ्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र मोटरमेन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

मोटरमेनच्या या मागण्या -  

  • मोटरमेनच्या २२९ रिक्त जागा भरा
  • सिग्नल नियम मोडल्यास मोटरमनला कामावरुन कमी करण्याचा नियम मागे घेण्यात यावा, अशा मागण्या करत मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून शुक्रवारी ओव्हरटाईम न करता नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला होता.

मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा, हे आहे कारण...

loading...

Top 10 News

राशी भविष्य