Monday, 21 January 2019

तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत सादर होऊ शकले नाही...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तिहेरी तलाक विरोधी विधेयक पुन्हा लांबलं आहे. मुस्लिम महिलांना घटस्फोट आणि पोटगीचा अधिकार देणारं हे विधेयक राज्यसभेत सरकार आज सादर होऊ शकले नाही. पण सर्व पक्षांचं याबाबत एकमत होऊ न शकल्यामुळे हे विधेयक आता पुढच्या अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात येईल.

हे विधेयक लोकसभेत आधीच पास झाले असून राज्यसभेत आज सादर करण्यापूर्वी या विधेयकात तीन महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले आहेत.  विरोधकांच्या गोंधळामुळे सरकार झुकले. यामुळे आता संसदच्या पुढच्या सत्रातच हे विधेयक सादर होईल.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक विरोधी कायदा करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात आले होते.

तेव्हा लोकसभेत पास झाल्यावर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या विधेयकातील काही तरतूदींवर आक्षेप घेतल्यामुळे ते पास होऊ शकले नाही. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते. 

तेहरी तलाक बाबत केंद्र सरकार जी भूमिका घेत तेहरी तलाक बाबत संसदेत जो ठराव पास केला जात आहे तो आम्हाला मान्य नाही मुस्लिम समाजाच्या लाखो महिला या साठी रस्त्यावर उतरल्या होत्या, मात्र सरकार आमच्या भावना समजत नाही,आम्हाला आरक्षण द्या मात्र तेहेरी तलाक बाबत ढवळा ढवळ करू नये, असं मत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री फोजीया खान यांनी नगर येथे व्यक्त केलं आहे.

मुस्लिम महिलांना न्याय; तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट

तिहेरी तलाकवर बंदी...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य