Friday, 18 January 2019

एकीकडे शहीद मेजर राणे यांना आदरांजली अन् दुसरीकडे बर्थडे पार्टीचा जल्लोष...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काश्मिर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांसह  मीरारोडचे राहणारे मेजर कौस्तुभ राणे शहिद झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली असतानाचं त्यांच्या घरा पासुन हाकेच्या अंतरावरच भाजपाचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती यांचा वाढदिवस मात्र मंगळवारी सायंकाळी मोठय़ा धुमधडाक्यात आणि डिजेच्या तालावर भाजपाने जल्लोषात साजरा केला.

शहराच्या महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता सह भाजपा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी या जल्लोषात सहभागी होत केक खाल्ला व खाऊ घालत भाषणं सुध्दा ठोकली.

विशेष म्हणजे या सर्वानी सोशल मीडियावर शहिद राणे यांना आंदरांजलीच्या पोस्ट टाकल्या आहेत . शहीद व त्यांच्या कुटुंबियां बद्दल असलेली भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिके बद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

सोमवारी रात्री काश्मिरच्या गुरेज सेक्टर मध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना देशाचे 4 जवान हुतात्मे झाले. या मध्ये 29 वर्ष वयाचे मीरारोडच्या शीतल मधील हिरल सागर इमारतीत राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे देखील शहिद झाले.

मंगळवारी सकाळीच याची माहिती मिळाली. दुपार पासुन तर सोशल मिडीयावर तसेच बातम्यां मधुन सुध्दा मेजर कौस्तुभ राणे शहिद झाल्याचे समजल्या नंतर त्यांच्या मीरारोड येथील घरी दुपार पासुनचं लोकं जमु लागली. 

महत्वाचे म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहता देखील कुटुंबियांची भेट घेऊन आले.

केवळ मीरारोडच नव्हे तर राज्य व देशात या 4 जवानांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात असताना शीतल नगरच्या बाजुच्याच भागातील भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मात्र आपला मंगळवार 7 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस जाहिरपणे धूमधडाक्यात साजरा केला.

शहिद राणे यांच्या घरा पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगीड इस्टेट जवळील सेंट पॉल शाळे समोर आलिशान मंडप टाकुन भाजपा नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंनी अगदी जल्लोष केला.

या वेळी विविध थंडपेयांसह खाद्यपदार्थाची मोठी मेजवानीही ठेवण्यात आली होती.

महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपाचे प्रशांत दळवी, दिपीका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार, मनोज दुबे, दिनेश जैन, अनिल विराणी आदी नगरसेवकांसह निलेश सोनी, वनिता बने, काजल सक्सेना , सोनिया नायक , किरण चेऊलकर, सुरेश दुबे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापला. 

आमदार नरेंद्र मेहता यांचे आगमन होताच शहेंशाह हे गाणं डिजेवर वाजवण्यात आले.  महापौर डिंपल , आमदार मेहता सह नगरसेवक, पदाधिकारी आदिंनी एकमेकांना केक भरवुन वाढदिवसाचा जल्लोष केला.

तसेच पुष्पगुच्छही देण्यात आले. या वेळी महापौर डिंपल व आमदार मेहता यांनी भाषण करत मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य