Sunday, 16 December 2018

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंद...मुंबईत बंदवरुन संभ्रम....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुंबईत आहे की नाही यावरुन संभ्रम कायम आहे. कारण काल मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मतभेद झाल्यानंतर काहींनी ठिय्या तर काहींनी बंदची भूमिका घेतलीये.

तर दुसरीकडे ठाणे आणि नवी मुंबईत मोर्चाच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आलेली नसली तरी सकाळपासूनच दोन्ही तुरळक वाहतूक सुरू आहे.

स्कूल बसेस न चालवण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

  • बंदमध्ये सहभाग नसतानाही आज नवी मुंबई, ठाण्यातील काही शाळा बंद....एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय....
  • शांततेत आंदोलन करण्याच्या आवाहनानंतरही महाराष्ट्र बंदला हिंगोलीत हिंसक वळण..सेनगावमध्ये आंदोलकांनी जाळली मिनी स्कूल बस...
  • नवी मुंबईत जनजीवन सुरळीत
  • नवी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त
  • नवी मुंबई बंद मध्ये सहभागी नसली तरी खबरदारी म्हणून चोख पोलिस बंदोबस्त
  • जालना  जिल्हातील मंठा शहरातील बाजारपेठ सकाळपासून बंद आहेत.
  • मंठा शहरात सकाळपासूनचं बाजारपेठ उघ़डते.
  • तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शहरातील ऑटो रिक्शा, बस सेवा बंद आहे.
  • जालना- परभणी मार्गावर आंदोलक दिवसभर ठिय्या आंदोलन करणार आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य