Saturday, 15 December 2018

चेंबूरमधील बीपीसीएल कंपनीला भीषण आग...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीमधील हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं.

या स्फोटात ४५ कर्मचारी जखमी झाल्याचे माहिती असून ४५ जखमींपैकी काही जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले तर काहींना चेंबूर येथील सुश्रूत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाडयांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.

रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली. यामुळे जवळील परिसरात भितीचं वातावरणं पसरलं होतं

 स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी किती जिवितहानी झाली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.   

 या भीषण आगीमुळे चेंबूर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले.

या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. त्यामुळे दक्षता म्हणून येथील झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य