Saturday, 15 December 2018

70 मांजरी, 3 कुत्रे अन् ‘ती’...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

आजच्या काळात एका घरात एकत्र रहाणं माणसांलाही जमतं नाही तसेच जर आपल्यामध्ये आणखी एका माणसाची भर झाली तर त्रास होऊ लागतो, मात्र मुंबईतील जुहूमध्ये एका 200 चौरस फुटाच्या खोलीत 70 मांजरी, 3 कुत्रे आणि त्यांची एक मालकीण अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. 

cat-story2.png

मुंबईत आपल्या माणसांना घरी ठेवायला लोकं तयार नसतात तर चक्क प्राण्यांना आपल्या घरात राहायला देणं थोडं कठीणचं. आवड म्हणून एखादा प्राणी पाळणारे अनेक प्राणीप्रेमी आहेत. मात्र मुंबईतील या 37 वर्षीय महिलेने चक्क रस्त्यावर सोडलेल्या मांजरींना आपल्या घरात आश्रय दिला आहे. 

catstory-women.png

सीना शिवदासी असे या महिलेचं नाव असून सीना एक-दोन नव्हे तर तब्बल 70 मांजरी आणि तीन कुत्र्यांचा सांभाळ करतेय. 

या मांजरींपैकी अनेक मांजरी या जखमी अवस्थेत त्यांना मुंबईच्या गल्लीबोळात सापडल्या होत्या. तर अनेक मांजरींवर उपचार करुन सीनाने त्यांचा सांभाळ केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य