Tuesday, 11 December 2018

मराठा आरक्षण : ९ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक, नवी मुंबई-ठाणे वगळलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या 9 ऑगस्टला राज्य बंदची हाक देण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू होणार आहे. त्याचबरोबर आंदोलकांनाही प्रतिबंधात्मक नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. नवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच जिल्ह्यात शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केलीय.

 • बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
 • बंद मध्ये कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये
 • प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे आहे
 • बंद 24 तास असेल
 • कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
 • पोलीस प्रशासनला सहकार्य कऱयाचे आहे
 • बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
 • सोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करायची आहे
 • अफवांवर विश्वास ठेवू नका
 • मराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा आहे
 • आपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये
 • मराठ्यांनी लढाई जिंकली आहे तहात हरणे आम्हाला मान्य नाही
 • आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही,हातातोंडाशी आलेला घास खायला आपण असणे महत्त्वाचे आहे
 • कोणतेही गालबोट न लावता 9 ऑगस्ट चा बंद आपण सर्वांनी यशस्वी करण्याचा आहे
 • बंद असा करायचा की पुढच्या वर्षी फक्त क्रांती दिन नाही तर "मराठा क्रांती दिन"अस नमूद केलं पाहिजे
 • चला तर मग आपण बंद मध्ये सहभागी होऊया आणि मुंबई शांततेच्या मार्गाने बंद करूया
loading...

Top 10 News

राशी भविष्य