Sunday, 20 January 2019

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, सामान्य नागरिकांचे हाल

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सातव्या वेतन आयोगासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी या संपाचे परिणाम दिसले.

राज्यभरात काल कर्मचाऱ्यांनी विविध सरकारी कार्यालयांबाहेर सरकारविरोधात संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे.

सर्व शासकीय कामकाज ठप्प आहे. सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा जुनी पेन्शन योजना लागू करा या अशा मागण्यांसाठी राज्यभरात शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तीन दिवसांच्या या संपाचा आज दुसरा दिवस आहे.

संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी या संपाचा परिणाम कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयालाही संपाचा फटका बसला आहे. रुग्णालयात रुटीन ऑपरेशन ठप्प झाले आहेत.

रुग्णालयातील सर्व नर्स, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय संपावर गेले होते. रुग्णालयातर्फे केवळ अत्यावश्यक ऑपरेशन सुरु ठेवण्यात आले होते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य