Saturday, 15 December 2018

17 लाख सरकारी कर्मचारी संपावर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून 7, 8 व 9 आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.

कर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिकारी महासंघाने मात्र संपातून माघार घेतली आहे.

जे जे रुग्णालयाचं काम ठप्प 

 • केवळ अत्यावश्यक ऑपरेशन सुरु आहेत
 • रुग्णालयाच्या सर्व परिचारीका, सफाई कामगार, टेक्निशीयन, वॉर्ड बॉय संपावर गेले

रुग्णालयाने केलेल्या सुविधा 

 • बाहेरुन 120 प्रसिक्षीत परिचारीका  बोलावण्यात आल्यात
 • 200 इंटर्न शिकावू डॉक्टर्स  
 • बाहेरचे 34 सफाई बोलावण्यात आले 
 • 68 सेक्युरीटी गार्डही कामाला लावण्यात आलेत

औरंगाबाद घाटी रुग्णालयात परिचारिका, परिचारक, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा संप

 • विविध मागण्यांसाठी करणार संप
 • अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
 • परिचरिकांच्या जागेवर नर्सिंगच्या वैद्यार्थिनींना करणार पाचारण
 • नियमित शस्त्रक्रिया रद्द

काय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

 • सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा 
 • केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा 
 • अंशदायी पेंन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा 
 • कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा 
 • जवळपास 1 लाख 85 हजार रिक्त पदे भरा
 • पाच दिवसाचा आठवडा करा
 • भरतीमध्ये अनूकंपा धारकांना सहभागी करुन घ्या

कुठल्या विभागावर परिणाम पडणार -

 • मंत्रालय  कर्मचारी 
 • शासकीय रुग्णालयातील परिचारीका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, टेक्निशीयन
 • शासकीय मुद्रणालय 
 • वस्तू व कर विभाग
 • सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर
 • रेशनींग कार्यालये
 • सरकारी कोषागारे 
 • शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी
 • आरटीव्हो कार्यालयं
 • राज्य उत्पादन शुल्क कार्यालय
 • सर्व अनूदानीत आणि शासकीय प्राथमिक,माध्यमिक, ज्यू कॉलेज
 • शासकीय दूध डेयरी 
loading...

Top 10 News

राशी भविष्य