Saturday, 15 December 2018

मराठा आरक्षण : राज्यभरात बैठकांचं आयोजन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलनंं सुरूच आहेत.

  • मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजातील आमदार-खासदारांनी सहभागी व्हावे, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
  • लातूर येथील मराठा समाजातील आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी हा इशारा देण्यात आला आहे. 
  • या मोर्चामध्ये मराठा समाजाने लोकशाहीच्या मार्गाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, हिंसा न करता काय नेमकी भूमिका कोणती असावी या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. 
  • ही बैठक रविवारी 5 आॅगस्ट रोजी छत्रपती शिवजी महाराज मैदान, विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर या ठिकाणी होणार असल्याची माहिती मराठा मोर्चाच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. 
  • आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा काय असावी हे निश्चित करण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार आहेत.
  • पुण्यात आज दुपारी १ ते ४ या दरम्यान बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा समाजाची आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
  • आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तर, पालघरमध्येही धरणे आंदोलन होणार आहे.दुसरीकडे परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे.

मराठा आरक्षणाबाबत तत्परता दाखवा - उदयनराजे भोसले

loading...

Top 10 News

राशी भविष्य