Saturday, 15 December 2018

Happy Friendship Day : असे ओळखा खरे मित्र

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मु्ंबई

ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' आला. कुठेतरी या दिवसाची भुरळ पडत चालली आहे. पहिल्यासारखे आता फ्रेन्डशिप डे निमित्त फ्रेन्डशिप बॅंड, गिफ्टचं ते क्रेझ कुठेतरी कमी झालेलं दिसतयं. आता टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा जरा बदलल्याचं दिसून येत आहे.

मैत्रीचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं.

मात्र आपले खरे मित्र आणि स्वार्थी लोक कसे ओळखायचे हे जाणून घ्या...

असे असतात खरे मित्र -

 • तुमचा खरा मित्र सर्व परिस्थितीत तुमच्यासोबत नेहमी उभा राहतो. तो तुमची साथ कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही.
 • जर तुमची एखादी गोष्ट तुमच्या मित्राला आवडली नाही तर तो तुमच्याशी बोलतो. तुमच्या चुकांवर तो पांघरुनही घालतो. केवळ तुमच्या सुखातच नाही तर दु:खातही सहभागी असतो तोच तुमचा खरा मित्र असतो.
 • खरे मित्र तुमच्यासाठी नेहमी धावून येतात, वेळात वेळ काढून भेटतात
 • खऱ्या मित्राला तुमच्या चांगल्या-वाईट सवयींबाबत सगळंकाही माहीत असतं. त्याला हे माहीत असतं की, तुम्ही कशा परिस्थितीत कसे वागणार आहात. ते कधीच भडकवण्याचं काम करत नाहीत.
 • तुमच्या खऱ्या मित्राला तुमचे सगळे सीक्रेट्स माहित असतात ,ते कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही
 • जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असता तेव्हा तुमचा खरा मित्र तुमच्यासोबत असतो. तुम्हाला योग्य प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत असतो.
 • खरे मित्र हे तुम्हाला कधीही चुकीचा सल्ला देत नाहीत. चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला देत असतात.

असे असतात स्वार्थी लोकं -

 • ते तुमची खिल्ली उडवत असतात. तुमच्या अपयशाची खिल्ली उडवत असतात.
 • ते लोक तुमच्या मागे वाईट बोलतात.
 • तुम्हाला मुद्दाम भडकवण्याचे काम करतात ते तुमचे खरे मित्र नसतात.
 • स्वार्थी लोकांच्या पोटात तुमचं सीक्रेट्स कधीच पचत नाही.
 • ते लोक केवळ आनंदाच्या वेळेसच तुमच्यासोबत असतात.
 • स्वार्थी लोक हे कधीही तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत.
loading...

Top 10 News

राशी भविष्य