Saturday, 15 December 2018

मुलुंडमध्ये झाली या कारणावरुन चेंगराचेंगरी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुलुंडमधल्या फार्मसी कार्यालयात फार्मसीसाठी नोंदणी करण्याकरीता उमेदवार आले होते. महाराष्ट्र भरातून उमेदवार इथे दाखल झाले होते. या कार्यालयात आज सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं समोर येतं आहे. घटना घडली त्यावेळी ५०० हून अधिक उमेदवार होते.

मुलुंडयेथील वीणा नगर जंक्शनच्या अगोदर असलेल्या रुणवाल इमारतीत फार्मसी कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर प्रवेशद्वारावर जवळपास ५०० उमेदवार जमा झाले होते.

दरम्यान, पाऊस सुरु झाल्याने उमेदवारांकडे त्यांचे महत्वाचे कागदपत्र होती. ती भिजू नयेत म्हणून आलेले उमेदवार आपली कागदपत्र पावसात भिजू नये म्हणून प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा चेंगराचेंगरीची प्रकार घडला आहे.

मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यात अनेकांना किरकोळ जखमा झाल्या असून यातील अनिकेत श्रृंगारे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्‍याने त्‍याला तात्‍काळ मुलुंडच्‍या फोर्टीस रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले तर इतर तिघांवर अग्रवाल रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.तिघांची प्रकृती सध्‍या स्थिर असल्‍याची माहिती आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य