Monday, 21 January 2019

मराठा समाज पेटून उठला, उद्या मुंबईसह नवीमुंबईत बंद !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला मराठा समाज मोर्चाचे पडसाद राज्यभरात पहायला मिळत आहे. मराठा मोर्चाने हिंसक वळण घेतले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेला मराठा मोर्चा आंदोलक संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या मोर्चादरम्यान काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे तर काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाज पेटून उठला आहे. तसंच “सरकारचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच उद्या मुंबईत एकही सायकल चालू देणार नाही”.

असा निर्धार मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे. उद्या मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. एपीएमसी मार्केटही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक

  • मराठा मोर्चाला हिंसक वळण
  • मराठा मोर्चा आंदोलक संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक
  • काही ठिकाणी तोडफोड तर काही ठिकाणी जाळपोळ
  • मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मुंबईसह नवी मुंबईत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय

सकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....

मराठा आंदोलन चिघळलं, राज्यभरात आंदोलनाचे पडसाद, पाहा अपडेट...

मराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी - चंद्रकात पाटील

मराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य