Tuesday, 18 December 2018

डेंग्यूविरोधात महापालिकेकडून जनजागृती...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
वातावरणातील बदलांमुळे एका बाजूला विषाणूजन्य आजार होत असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांचा निष्काळजीपणामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास सुरूच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या 2300 ठिकाणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
 
पावसाळ्यात विषाणूजन्य आजाराचा फैलाव हा मोठया प्रमाणात होत असतो त्या दृष्टीने महापालिका आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
 
जून आणि जुलै या पावसाळ्यात ही मोहीम आणखी कडक राबवली जात असते. दरम्यान अडीच लाख ठिकाणांवर डेंग्यू डासांना प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आलेली आहे, त्यापैकी 2300 ठिकाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक आढळल्याने त्यांना नोटिसा बजावली आली आहे.
 
झाडांच्या कुंडांमध्ये साठलेले पाणी,गच्चीवर ठेवलेले अडगळीचे सामान यामध्ये पाणी साठून राहिले असता त्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते,  त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात,इमारतींमध्ये किंवा परिसरात पाणी साठून राहणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेनी केले आहे.

प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

 • डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे आदी उपाय नक्कीच करता येतील.
 • शिवाय वैयक्तिक, घराभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण टाळू शकतो.

डेंग्यू म्हणजे काय ? 

 • डेंग्यू एका विषाणूमुळे होणारा आजार आहे.
 • या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत.
 • एडीस ईजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासाच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो.
 • डेंग्यू आपोआप बरा होणारा रोग असला तरी रोगाची अभिव्यक्ती सामान्य डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, शॉकसह डेंग्यू रक्तस्रावी ताप या तीन प्रकारे होऊ शकतो.

नियंत्रण कसे करता येईल

 • डेंग्यूचे डासांच्या अंगावर वाघासारखे पट्टे असल्याने त्याला ‘टायगर मॉस्किटो’ म्हणतात.
 • घर वा घराभोवतीच्या साठलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते.
 • फुटके डबे, बाटल्या, फेकलेल्या बादल्या, फ्लॉवरपॉट, नारळाची करवंटी, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या, पडलेले टायर अशा अनेक ठिकाणी पाणी जमा होते.
 • त्यात हा डास अंडी घालतो. डासाची मादी सहसा दिवसा चावे घेते.
 • डास जास्त उंच उडू शकत नसल्याने त्याचे निर्दालन करणे सोयीचे आहे.
 • अळ्या मारणारी व प्रौढ डासांना मारणारी कीटकनाशके फवारूनही डासांचा नायनाट करता येईल.

डेंग्यूची लक्षणे

 • बहुतांश लोकांमध्ये डेंग्यू संसर्गामुळे ताप हे लक्षण दिसून येते.
 • शिशू, मुले व पहिल्यांदाच डेंग्यूची लागण होणाऱ्या प्रौढांमध्ये इतर विषाणुजन्य रोगात येणाऱ्या तापाप्रमाणेच ताप येतो.
 • रुग्ण बरा होतानाच्या काळात किंवा तापासोबत अंगावर पुरळ येऊ शकते.
 • यासोबतच श्वसन संस्था व पचनसंस्था यांच्याशी संबंधित रोग लक्षणे आढळून येतात.
 • तसेच सामान्यपणे थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी हे लक्षणे दिसतात.
 • नंतरच्या २४ तासांत डोळे दुखायला लागतात आणि त्या व्यक्तीला उजेडही सहन होत नाही.
 • खूप थकवा येणे, भूक न लागणे, बद्धकोष्ठ, पोटात कळ येणे, जांघेत ओढल्यासारखे दुखणे, घसा खवखवणे, नैराश्य येणे आदी लक्षणे असतात.
 • साधारणत: पाच दिवस हा ताप राहतो. नंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
 • मात्र यात डेंग्यू रक्तस्रावी ताप गंभीर प्रकार आहे.
 • पहिल्या टप्प्यातील तापाप्रमाणे याची लक्षणे असतात.
 • मात्र ताप ४०-४१ डिग्रीपर्यंत वाढतो.
 • बालकांमध्ये यामुळे तापात झटके येऊ शकतात.
 • या प्रकारात केशनलिकांमधून रक्तद्रव बाहेर पडून गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
 • या प्रकारच्या डेंग्यूमुळे रुग्ण मृत्युमुखी पडतात.
 • तिसऱ्या प्रकारात ताप, रक्तस्राव तसेच शॉक या तिन्ही बाबी आढळून येतात.
 • या तीव्र डेंग्यूमध्ये केशवाहिन्यांतून रक्त द्रवाची गळती झाल्याने शॉकची लक्षणे दिसून येतात.
 • श्वसनाला त्रास होतो. गंभीर रक्तस्राव किंवा विविध इंद्रिये निकामी होतात.

उपचार

 • डेंग्यू सर्वसाधारण आजार असून क्वचितप्रसंगी गंभीर रूप धारण करू शकतो.
 • डेंग्यूवरील उपचार लक्षणानुरूप आहेत. विषाणू मारण्यासाठी प्रभावी औषधे नाहीत, तशी लसही नाही.
 • डेंग्यू जसा कोणालाही होऊ शकतो तसेच त्याला प्रतिबंधही करता येईल.
loading...

Top 10 News

राशी भविष्य