Tuesday, 20 November 2018

सततच्या मुसळधार पावसाने मुंबई मंदावली...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मागील 4 दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज म्हणजेच मंगळवारी सकाळपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबईतूल सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सलग पडणाऱ्या पावसामुळे सायन, माटुंगा, दादर, हिंदमाता परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच नालासोपारा आणि वसई-विरार रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने वसई-विराररकडे जाणारी रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे.

तर मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 165.8 मिमी तर उपनगरात 184.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विरारमध्ये 24 तासांत 235 मिमी तर वसईत पाऊस 299 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य