Saturday, 15 December 2018

अंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अंधेरी स्थानकाजवळ रुळांवर काल पूल कोसळल्याची घटना घडली होती. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला खडसावलं आहे. एलफिन्स्टन रेल्वेच्या पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात स्मिता ध्रुव यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं अंधेरी पूल दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत, महापालिकेला धारेवर धरले. मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अपघातांसाठी पालिका प्रशासनाच जबाबदार आहे. त्यांनी आपली जबाबदारी झटकू नये, असे न्यायालयाने सांगितले. 

न्यायालयाचे संतप्त सवाल 

  • अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसं जबाबदार नाही? 
  • नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरलं जात नाही ?
  • पूल पडण्याची वाट कशाला बघता?
  • पालिकेने सर्व पुलांचे याआधीच ऑडिट का केले नाही ?

आषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू

बोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईट डाऊन

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य