Saturday, 15 December 2018

अंधेरीतील रेल्वेस्थानकावर पुल कोसळला, 5 जण जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अंधेरी स्थानकावरील गोखले पुल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आज सकाळी सुमारे 7.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत, तर काही जण अजूनही  ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यानंतर आपत्तीनिवारण पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सकाळी गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे ट्रॅकवरचं पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरीहून विरारकडे आणि चर्चगेटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, दुपारी 3 नंतर रेल्वेसेवा सुरळीत होईल.

रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोसळलेल्या पुलाचा भाग लवकरात लवकर रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी आपत्ती निवारण पथकाचे प्रयत्न सुरु आहेत.

 

पश्चिम रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

  • बोरिवली – 02267634053
  • मुंबई सेंट्रल - 02267644257
  • चर्चगेट - 02267622540
  • अंधेरी - 02267630054 
loading...

Top 10 News

राशी भविष्य