Saturday, 15 December 2018

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

घाटकोपरमधील सर्वोदय हाॅस्पिटलजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  उत्तरप्रदेश सरकारचे एअर क्राफ्ट VT-UPZ king Airc90 हे विमान होते. दरम्यान हे विमान उत्तर प्रदेश सरकारने मुंबईच्या 'UY AVIATION'  या कंपनीला विकलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

विमानात पायलटसह 4 जण होते. हे सर्व दगावल्याची माहिती समोर येत आहे.

या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत. यांना राजावाडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.


ghatkopar23.jpg
माय मेडिकल मंत्राशी बोलताना अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूममधील अधिकारी म्हणाले, “अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात. अजून या घटनेबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत.”

घाटकोपर पश्चिमेकडील सर्वाैद्य हाॅस्पिटलजवळ ही घटना घडली. हा आवाज नेमका कसला? नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.

या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या घटनेची  माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LIVE UPDATE 

 • कोसळेलं चार्टेड प्लेन उत्तर प्रदेश सरकारचं नाही
 • उत्तर प्रदेश सरकारचा खुलासा 
 • मुंबईच्या यू वाय एवियेशनला हे विमान विकण्यात आलं होत
 • अलाहाबाद इथ विमानाला अपघात झाल्यानंतर विक्री करण्याचा घेतला होता निर्णय़
 • सुत्रांच्या माहितीनुसार, एका इमारतीच्या टेरेसवर हे विमान कोसळलं आहे. यात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
 • यात एक पादचारी असल्याचं सांगण्यात येत आहे.
 • उत्तर प्रदेश सरकारी एअर क्राफ्ट VT-UPZ king Airc90
 • दुपारी 1.16 मिनिटांनी कोसळले विमान
 • या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी
 • पोलिस घटनास्थळी दाखल
 • उत्तरप्रदेश सरकारचे विमान होते 
 • विमानात पायलटसह 4 जण होते
 • हे सर्व दगावल्याची माहिती समोर
 • घाटकोपरमध्ये मोठा आवाज
 • सर्वोदय हाॅस्पिटलजवळील घटना
 • सर्वत्र भीतीचे वातावरण
 • आगीचे लोळ पसरलेत
 • घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोरळलं
 • अद्याप अधिकृत घोषणा नाही
 • घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या दाखल

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य