Thursday, 16 August 2018
Previous Next

मनसे कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला राज ठाकरेंचा वाढदिवस...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. आज राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 9 रुपये स्वस्त करण्यात येणार आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येणार आहे.

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत.

राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या केकवर ‘हीच का पारदर्शक मतदान प्रक्रिया’ असा अनोखा संदेशपर प्रश्न विचारण्यात आला आहे.

तर पालघर च्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासाठी इव्हीएम मशीनची प्रतिकृती असलेला केक आणला आहे.

अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे.

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोल होणार स्वस्त

loading...

Top 10 News

Facebook Likebox