Tuesday, 22 January 2019

प्रभादेवीतील दीपिकाच्या राहत्या इमारतीला भीषण आग...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रभादेवी परिसरात इमारतीला आग लागली आहे. ब्यूमॉन्ट असं या इमारतीचं नावं असुन अगदी वरच्या 33 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारतीच्या टॉप फ्लोअरला ही आग लागली आहे. आतापर्यंत या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 3 वॉटर टँक घटनास्थळी पोहोचले आहे. इमारतीला सव्वा दोनच्या सुमारास ही आग लागली. लेवल 2 ची आग असल्यामुळे अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. इमारतीच्या बी विंगमध्ये आग लागली आहे.

या इमारतीच्या आजूबाजूला इतर इमारतींची गर्दी आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला थोडा त्रास होत आहे. 33 व्या मजल्यावर लोकं राहत असल्याचं देखील समजत आहे. त्यांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं आहे. अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता.

याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमन दलाच्या सहाय्याने अाता ही आग नियंत्रणात आली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य