Sunday, 20 January 2019

#2018 Intercontinental Cup : आज भारत - न्यूझीलंड आमनेसामने

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आशिया कपच्या तयारीसाठी भारत १ जूनपासून मुंबईमध्ये चार देशांचा समावेश असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. भारताव्यतिरिक्त या स्पर्धेत चीन ताईपे, केनिया आणि न्यूझीलंड हे संघ सहभागी झाले आहेत. मुंबईत १ जूनपासून चार देशांमध्ये ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’ स्पर्धा रंगली आहे.

मुंबईत अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरु असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध भारताचा सामना होणार आहे. 

भारतात क्रिकेट या खेळाला जास्त महत्व दिले जातात. प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेट खेळताना मुले दिसतात. लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात क्रिकेटविषयी वेगळेच प्रेम दिसून येते. पण आता हळूहळू क्रिकेटबरोबरच कबड्डी, फूटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या खेळांनाही भारतीयांची पसंती मिळत आहे.  मात्र भारतातील फुटबॉल फिव्हरचे कारण आहे भारतीय संघाची इंटनकॉन्टिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी.

या स्पर्धेत भारताने एकूण २ सामने खेळले असून दोनही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारताने चायनीज तैपई संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे भारताची अंतिम सामन्यातील स्थान जवळपास निश्चित आहे.

भारतीय संघ फिफा रॅँकिंगमध्ये ९७ व्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तीनवेळा हॅट्ट्रिक केली.

आज होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने भारतीय प्रेक्षकांना सामना पाहायला आवाहन केले होते. या आवाहनाला दणक्यात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. 

त्यानंतर आता आज होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीही स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहे, तसेच भारताचे स्थान निश्चित मानल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची पूर्ण तिकिटेही विकली गेली आहेत.

 

त्यानंतर या आवाहनाला पाठिंबा देत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही प्रेक्षकांना विनंती केली आहे.

कोहली म्हणतो, ' सुनील माझा चांगला मित्र आहे. आपण सर्वांनी फुटबॉल संघाने घेतलेल्या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर यायला हवे. सर्वच खेळांवर प्रेम करणारा देश म्हणून भारताचे नाव जगभर व्हायला हवे़'

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य