Tuesday, 13 November 2018

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोल होणार स्वस्त

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटकातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गगनाला भिडलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा भडका उडत आहे. 

असे असतांना मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांना एक दिवसासाठी दिलासा देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही युक्ती लढवली आहे. येत्या 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येणार आहे.

दरम्यान, देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर प्रतिलीटर ८५.६५ रुपये तर डिझेलचा दर ७३.२० इतका झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप होत आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीकाही मनसेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मनसेकडून हा पुढाकार घेण्यात आला असून ती दिलासादायक आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य