Sunday, 20 January 2019

शीळसम्राट निखील राणेची धूम

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्युज, मु्ंबई

शिटी वाजवणे हे टपोरी आणि असभ्य वर्तन समजले जाते. मात्र, जपान या देशात शिटी वाजवणे ही एक परफॉर्मिंग आर्ट आहे. जगात शिस्तप्रिय देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये जगभरातील व्हिसलर्सचं 'वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन २०१८' नुकतेच पार पडले. या स्पर्धेत मुंबईकर निखील राणे या तरुणाने सलग दुसऱ्यांना भारताला चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे. हिकीफुकी या प्रकारात त्याला चॅम्पियनशीप मिळाली असून यात वाद्य वाजवत शिटी वाजवायची असते.

 'वर्ल्ड व्हिस्टलर्स कन्व्हेंशन'मध्ये इस्राइल, कॅनडा, जपान, चीन, कोरीया, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला आदी देशांचा सहभाग होता. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये निखिलने 'वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन'मध्ये सहभाग नोंदवत भारताला पहिल्यांदा चॅम्पियनशिप मिळवून दिली. विजयाची हीच परंपरा कायम राखत यंदाही निखिलने भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा उंचावले आहे.सादरीकरणात निखीलने 'शोले' या सिनेमातील 'मेहबूबा मेहबूबा' हे गाणं शिट्टीतून वाजवले होते. यावेळी त्याने दरबुका, कहॉन बॉक्स, खंजिरी, पियानिका आणि घुंगरू ही वाद्ये देखील वाजवली. निखीलच्या शिट्टी वाजवतानाची पद्धत ही मूक अर्थात 'सायलेंट व्हिसल' आहे.

जगात 'सायलेंट व्हिसल' वाजवणारे केवळ दोन कलाकार आहे. त्यातील एक म्हणचे बॉस्टनचा जेफरी एमॉस आणि दुसरा निखिल राणे. 

जगात मान्यता असलेल्या या कला प्रकाराला भारतात मानाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे. आपल्या भारताचा कानाकोपरा विविध कलाप्रकारांनी नटलेला आहे. आपल्याला फक्त त्यांना कलेच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. भारतात शिटी वाजवण्याच्या कलेला देखील परफॉर्मिंग आर्टचा दर्जा मिळावा यासाठी माझ्यासारख्या व्हिसलर्सचे प्रयत्न सुरू आहेत. माझं आजचं यश माझ्या कुटुंबीयांना आणि भारतीय तिरंग्याला समर्पित आहे.' असं मत निखिलने 'जय महाराष्ट्र' वर व्यक्त केलं आहे. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य