Tuesday, 13 November 2018

रेल्वेच्या खाद्यपदार्थांवर आता 18 टक्के जीएसटी लागणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

प्रवाशांची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या खाद्यपदार्थांवर आता 18 टक्के जीएसटी लागणार असल्याची माहीती वर्तवण्यात आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आता प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.  कारण रेल्वेतील खान-पानासाठी आता जास्त जीएसटी भरावा लागणार आहे. रेल्वे डब्यात प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या खाद्य-पेयांवर यापुढे 18 टक्के जीएसटी  लावला जाईल, असा  निर्णय दिल्लीतल्या एएआरने (अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने )घेतला आहे.

आतापर्यंत केंद्र सरकारकडून या खाद्य-पेयांवर माफक दरात 5 टक्के जीएसटी लावण्यात येत होता. रेल्वे ही प्रवासाचं साधन असल्याने रेल्वेला कँटिन किंवा रेस्टॉरंट मानलं जाऊ शकत  नाही. त्यामुळे खाद्य-पेयांवर पूर्ण 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असं या अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगचं म्हणनं आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य