Tuesday, 16 October 2018

यावर्षी अबांनींच्या घरी वाजणार ‘सनई चौघडे'

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज मुंबई

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा डिसेंबर महिन्यात पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. आनंद पिरामल याच्याशी तिचा विवाह होणार आहे. आनंद हा पिरामल समूहाचे संस्थापक अजय पिरामल यांचा मुलगा असून या दोन कुटुंबांमध्ये 4 दशकांपासून मैत्री होती आणि आता याच मैत्रीचं रूपांतर नात्यात होणार आहे. रिलायन्स उद्योगसमूहाने औपचारिक पत्राद्वारे या लग्नाची घोषणा केली आहे.

महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून हा आनंद साजरा केला होता. ईशाचा लग्नसोहळा भारतातच होणार असल्याचं रिलायन्सच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. आता लवकरचं सर्वांना या लग्न सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य