Sunday, 20 January 2019

ज्येष्ठ संगीतकार अरुण दाते याचं निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ संगीतकार आणि भावगीत गायक अरुण दाते यांचं वृध्दापकाळानं निधन झालं आहे. मुळचे इंदोरचे असलेले अरुण दाते यांनी वडिलांच्या इच्छेनुसार गायन क्षेत्रात पदार्पण केलं. कुमार गंधर्व हे अरुण दाते यांचे गुरु होते, त्यांनी पुढचं शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. 1955 पासून अरुण दातेंनी आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचं संगीत यांनी सजलेल्या 'शुक्रतारा मंदवारा,' या गाण्यातून अरुण दाते खऱ्या अर्थाने नावारुपास आले.

1962 मध्ये त्यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली होती. मंगेश पाडगावंकर यांनी लिहीलेलं आणि यशवंत देव संगितबध्द केलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणं अबालवृध्दांना वेड लावणारं होतं. आश्चर्यांची गोष्ट अशी की 60 च्या दशकात अरुण दातेंनी गायलेली गाणी विसाव्या शतकातल्या नव्या पिढीच्या ओठांवर सहजरीत्या रुळली जात आहेत याचा आनंद दातेंना होत होता.

आजारपणामुळे गेल्या काही महिन्यापासुन अरुण दाते हे अंथरुणाला खिळुन राहीले होते, अश्यावेळी त्यांचा मुलगा अरुण दातेंचीच गाणी त्यांना ऐकवत असत. जिवनात नैराश्य आलेल्या व्यक्तीनं या जन्मावर शतदा प्रेम करावे हे गाणं ऐकलं की त्यांना आलेली मरगळ आणि नैराश्य दुर व्हायचं इतकी ताकद या गाण्यात होती.

आश्चर्यांची गोष्ट अशी की अरुण दाते यांनीही या जन्मावर शतदा प्रेम करावे हेच गाणं ऐकुन अखेरचा श्वास घेतला. हा निव्वळ योगायोग म्हणावा की खरंच जन्मावर प्रेम करणा-या या गायकाने गाण्यावर प्रेम करतचं या जगाचा निरोप घेतला.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य