Tuesday, 16 October 2018

उंदराने चावा घेतलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महापालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे या ट्रॉमा केअर रुग्णालयात कोमामध्ये असलेल्या परविंदर गुप्ता या तरुणाच्या डोळ्याला काही दिवसांपूर्वी उंदराने चावा घेतला होता. या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. परविंदरला काही दिवसांपूर्वी आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. पण, त्याच दिवशी त्याच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याचे वडील रामप्रसाद गुप्ता यांनी केला होता.

हात दुखत असल्याच्या कारणामुळे तब्बल 40 दिवस परविंदर गुप्ताला ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर परविंदर काहीच बोलू शकला नाही, असे त्याच्या भावाने सांगितले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य