Sunday, 20 January 2019

‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जादा भाडेवाढ, फेऱ्यांची कमी झालेली संख्या, तिकीट मशीनमधील बिघाड अशा वेगवेगळ्या कारणांनी बेस्ट उपक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. अशातच दिवसाला कशीबशी २८ लाख प्रवासी संख्या असणाऱ्या बेस्टची प्रवासी संख्या दोन लाखांनी घटून २५ लाख ९० हजारांवर पोहोचल्याचा दावा गुरुवारच्या बेस्ट समिती बैठकीत करण्यात आला.

व्यवस्थापनातील त्रूटीमुळे बेस्टचा प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरकडे वळत असल्याने प्रवासी संख्या घसरत चालली आहे. बेस्टची प्रवासी संख्या गेल्या 7 वर्षांत ४० टक्क्यांनी घटली आहे. २००९-१० मध्ये बेस्टची प्रवासी संख्या ४३ लाख ७० हजार इतकी होती, मात्र आता ती संख्या २५ लाख ९० हजारांपर्यंत कमी झाली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य