Sunday, 20 January 2019

आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. हा वितरण सोहळा गुरुवारी सकाळपासूनच चर्चेत राहिला. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जात आहेत.

या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्याने विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर काही कलाकारांनी हा पुरस्कार अखेर स्विकारला आहे. त्यामुळे हा बहिष्कार मागे घेतल्याचे चित्र दिसून आले. प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

‘भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा असतो. पण तोच क्षण जर डावलला जात असेल तर ही वागणूक अपमानास्पद आहे असं वाटतं,’ अशा शब्दांत प्रसाद ओकने संताप व्यक्त केला, तर आतापर्यंत जी प्रथा सुरू होती ती याच वर्षी अचानकपणे मोडण्याचं कारण काय ? असा प्रश्न मंदार देवस्थळी यांनी उपस्थित केला होता.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य