Tuesday, 16 October 2018

ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात छोटा राजन दोषी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बहुचर्चित ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या खटल्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल आहे. ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले असून पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

छोटा राजनसहीत 9 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं हा निकाल दिला आहे. या निकालानंतर छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागूण राहिलं आहे.

मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास करून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून झाल्याचे स्पष्ट केले. जे. डे यांची हत्या त्यांच्या पवईतील निवासस्थानाजवळ ११ जून २०११ ला भरदिवसा गोळ्या झाडून करण्यात आली होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य