Monday, 21 January 2019

...म्हणून राज ठाकरे मुलुंडमध्ये सभा घेणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज ठाकरे यांची रविवारी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे. शनिवारी नाणार प्रकल्पवासी, शेतकरी आणि आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आणि लवकरच म्हणजे 1 मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. या राज्यव्यापी दौ-याच्या अनुषंगाने राज यांची एक वादळी सभा होणार आहे.

या सभेद्वारे राज ठाकरे महाराष्ट्राभरातील सर्व मनसैनिकांना संदेश पोहचण्याच्या दृष्टीने भाष्य करतील असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी सायंकाळी 6 वाजता मुलुंड येथे 100 महिलांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून रिक्षा व परमिट, बॅचचे वाटप राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर त्यांची जाहीर सभा होईल.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य