Sunday, 21 October 2018

‘त्या’ अपघाताला नायर रुग्णालय जबाबदार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नायर रुग्णालयात एमआरआय अपघात घडला होता. एमआरआय मशिनने खेचून घेतल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी मुंबई पालिकेकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. तपासणीच्या प्राथमिक अहवालात नायर रुग्णालयातील आया, वॉर्डबॉय दोष असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजेश आपल्या बहिणीच्या नातेवाईकांची मदत करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते एमआरआय कक्षाकडे निघाले. त्यांच्या हातात ऑक्सिजन सिलिंडर होता. मशिन बंद आहे, तुम्ही आत जाऊ शकता असे वॉर्डबॉयकडून सांगण्यात आले. एमआरआय कक्षात कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. त्याचक्षणी राजेशला एमआरआय मशीनने खेचून घेतले आणि उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राजेश यांच्या मृत्यूला पूर्णपणे नायर रुग्णालय जबाबदार आहे, असे राजेशचे भाऊ योगेश मारु यांनी सांगितले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य