जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ठाण्याजवळील मुंब्र्यात तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडलीय. 20 वर्षीय तरुणी मुंब्रा येथून कामावरून घरी जात असताना तिच्या ओळखीच्याच तरुणाने तिच्यावर अत्याचार केलेत. रिक्षात बसवण्याचा आग्रह करून आरोपी आणि त्याच्या सहकारी रिक्षा चालकाने दिव्यात एका खोलीत नेऊन या तरुणीवर अत्याचार केले.
त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करत तरुणी घरी पोहोचली. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. दरम्यान आरोपिविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.