Friday, 14 December 2018

रक्तपिपासू पॅथॉलॉजी लॅब संदर्भात जय महाराष्ट्रची विशेष बातमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विविध तपासण्यांच्या नावाखाली रक्त शोषणाऱ्या अनधिकृत पॅथॉलॉजि सेंटर्सना टाळे ठोकण्याची तयारी ठाणे महानगर पालिकेने सुरु केलीय. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पॅथॉलॉजि लॅबची संपुर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅथॉलॉजीचे पदवी प्रमाणपत्र,एमएमसी नोंदणी प्रत,फायर एनओसी इत्यादींसह आठ अटी आणि नियमांच्या पूर्ततेचा लेखाजोखा मांडावा लागणार असून त्यानंतरच पालिकेकडून त्यांना पॅथॉलॉजि सेंटर चालवण्याचीपरवानगी मिळ्णार आहे. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील अनधिकृत पॅथॉलॉजि सेंटर्सचा बाजार उठणार आहे.

ठाण्यातील हॉटेल्स आणि डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाणे महानगर पालिकेने आता शहरातील पॅथॉलॉजि सेंटर्सकडे मोर्चा वळवला आहे. सध्या शेकडो छोटे-मोठे पॅथॉलॉजी लॅब ठाणे आणि परिसरात आहेत. मात्र, त्यांची नेमकी आकडेवारी किती याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. या लॅबमध्ये होणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या आणि त्यांचा अहवाल किती वैध मानायचा हा प्रश्नच आहे. आणि याचाच गैरफायदा घेत अनेक पॅथॉलॉजि लॅब मालकांनी निव्वळ नफा कमविण्यासाठी धंदा सुरु केला आहे. पैसे कमवण्याच्या या व्यवसायाला न्यायालयाने आळा घातलाय. पॅथॉलॉजी लॅब्सना नोंदणीची सक्ती केली आहे. असे न केल्यास 1 मे पासून प्रती दिवस 50 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर टी. केंद्रे यांनी दिलीय.

ठाणे शहरात एकूण 100 पॅथॉलॉजि लॅब्स आहेत. त्यात फक्त 30 एम डी पॅथॉलॉजिस्ट आहेत. तर काही पॅथॉलॉजी लॅब्स मुंबईतील मोठ्या पॅथॉलॉजिस्ट लॅब्सच्या नावाने ठाणे शहरात चालवतात. एकच पॅथॉलॉजिस्ट 30 लॅब्स साठी पैसे घेऊन सह्या विकत असल्याची धक्कादायक माहिती ठाणे पॅथॉलॉजि संघटनेचे अध्यक्ष दिनकर देसाई यांनी दिलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य