Saturday, 15 December 2018

रस्त्यावर सूसाट वाहन चालवताय? तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या रस्त्यांवर वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवले तर आता तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहेत. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालनकांवर ट्रॅफिक पोलिसांचा तिसरा डोळा नजर ठेवून आहे. मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात ट्रॅफिक पोलीस विभागाकडून 47 स्पीड कॅमेरे लावण्यात आले असून यांच्यामार्फत मार्च 2018 च्या महिन्यात तब्बल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 85427 केसेस ई चलनद्वारे नोंदविण्यात आल्या आहेत.

मुंबईतील रस्त्यावर आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर हे स्पीड कॅमेरे लावण्यात आले आहेत. ट्रॅफिक पोलीस विभागातर्फे बांद्रा -वरळी सिलिंक वर 80 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची परवानगी वाहनचालकांना देण्यात आली आहे. या बरोबरच मारिन ड्राइवच्या रस्त्यावर प्रतितास 60 किमी वेगाने गाडी चालवावी लागणार असून , पूर्व दृगतिमार्ग , पश्चिम दृगतिमार्ग आणि ईस्टर्न फ्री वेवर 80 किमी चा वाहनचालकांना पाळावा लागणार आहे. मुंबईतील इतर रस्त्यांवर ही वेगमर्यादा 60 किमी प्रतितास पर्यंत मर्यादीत राहणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य