Thursday, 17 January 2019

मुंबईतील शिक्षकांचा पाडवा कडू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र मुंबई

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी सर्व उत्साहात आहेत मात्र मुंबईतील अनेक शिक्षक त्याला अपवाद ठरणार आहेत. मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. या निकालानंतर महिना उलटूनही शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांची नवीन वर्षाची सुरुवात गोड होणार नाही हे निश्चित झाल्याचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून ९ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आला आहे. लॉ ऍण्ड ज्युडीशिअल विभागाने युनियन बँकेतून पगार देण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ठाण्यातील शिक्षकांचा पगार देण्यात येत आहे, मात्र मुंबईच्या शिक्षकांचा पगार सुरू झालेला नाही. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शिक्षण खाते सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सचिव सांगत आहेत. शिक्षणमंत्री आणि सचिवांच्या आडमुठय़ा धोरणामुळे अद्यापही शिक्षकांचे पगार जमा झाले नाहीत. यासंदर्भात शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीही आपण सुप्रीम कोर्टात जाणार नाही आणि शिक्षकांचे पगार लवकरच देऊ असे आश्वासन देऊन संबंधितांना सूचनाही केल्या होत्या. मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळालेच नाही, असे सांगणारे सचिव नंदकुमार खोटे बोलत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे. तसेच तत्काळ शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

शिक्षकांच्या पगारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधिल आहे. परंतू शिक्षकांची पूर्वीच्या बँकेतील खाती नवीन खात्यामध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे ठाण्यामध्ये शिक्षकांचे पगार काढण्यात आले तसे येथील शिक्षकांचे पगार काढता येतील व त्यानंतर उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार पगार काढण्यात येतील, पण कपिल पाटील यांचाच हट्ट आहे की, आताच युनियन बॅंकेतून पगार काढा, त्यामुळे केवळ राजकीय भांडणासाठी हेच शिक्षकांचा छळ करीत आहेत आणि माझ्यावर आरोप करीत आहे असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानभवनात प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य