Sunday, 20 January 2019

सोनिया गांधींच्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेससह सीपीआयएम आणि इतर पक्षांच्या नेत्यांची हजेरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. 13 मार्च रोजी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

या डिनरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राजदचे तेजप्रताप यादव, बसपा नेते सतीश चंद्र, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, तारीक अन्वर, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, शरद यादव, आययूएमएलचे पी. के. कुन्हालीकुट्टी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसचे जोस के. मणी, जनता दल सेक्युलरचे डी. कुपेंद्र रेड्डी आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांची उपस्थिती होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला हे नेतेही डिनरला हजर होते.

दरम्यान, कालच अखिलेश आणि मायावतींच्या युतीने योगींना गोरखपूर आणि फुलपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याची पुनरावृत्ती देशभर करण्यासाठी महाआघाडीचा प्रयत्न सुरु झाला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य