Monday, 17 December 2018

मुंबईत ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशातील अडीच लाख गावे ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेटशी जोडण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात असतानाच देशातील आर्थिक राजधानीत मात्र ब्रॉडबँड इंटनेटचा वेग इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी आहे.

या वेगाला राज्यातील ठाणे जिल्ह्यानेही मागे टाकले आहे.

मुंबईत ब्रॉडबँड इंटरनेटचा वेग सरासरी १२.०६ एमबीपीएस इतकाच मिळतो आहे. तर, ठाण्यात हा वेग १३.६० इतका मिळतो आहे.

राज्यातील शहरांमधील इंटरनेटच्या वेगात ठाण्याने बाजी मारली आहे. या यादीत देशभरात चेन्नईने बाजी मारली असून तेथे सरासरी २७.७ एमबीपीएस इतक्या वेगाने इंटरनेट उपलब्ध होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य